पुण्यात झाडांची कत्तल रोखा; पर्यावरणासाठी राष्ट्रवादीचं आंदोलन | Pune
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामामुळे हजारो झाडांची कत्तल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महापालिकेच्या उद्यान
विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका कार्यकर्त्याने झाडावर बसून भाजपा आणि महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली